विचारांनो चला येवो तुम्हाला नीज आता
उठा भरपूर झाली ह्या मनाची झीज आता
किती लावायचे वाटेस डोळे ह्या नभांच्या
पडूद्या एकदाची ह्या मनावर वीज आता
किती धुंडाळले मी अर्थ माझ्या जीवनाचे
चला या होऊद्या आपल्या श्रमांचे चीज आता
कितीदा आर्जवांचे दान मी मातीस केले
तरी उगवायची राहून गेले बीज आता
देवेन पहिनकर