माळावरच्या एखाद्या रखरखत्या दुपारी,
बाभळी खालच्या बसस्टॉपवर मिणमिणत्या डोळ्यांनी…
येणाऱ्या प्रत्येक बसकडे आशेनं बघणारं आयुष्य…
रणरणत्या उन्हात तापलेलं, पायपिटीनी होरपळलेलं
व्याकुळ होत दिसेल त्या बसमध्ये चढायला आतुरलेलं,
तहानलेलं आयुष्य…
अखेर बस येते आणि अडखळत का होईना आयुष्य चढतच…
खिडकीशी बसतं, घाम पुसत सुटकेचा निश्वास टाकत…
मागे सुटणाऱ्या, सोडून आलेल्या त्या उन्हाळ्यांचे,
धगधगते हिशेब मांडायला डोळे मिटतंच, तेवढ्यात,
टिंग टिंग… बसची घंटा वाजते,
अखेर आयुष्य ज्या आठवणींना मागे सोडून निघालं होतं,
ती बस नेमकी त्याच गावाला निघाली होती…
आयुष्याची पण गंमतच आहे!
देवेन पहिनकर