प्रिये तुझ्या हाताची बोटं सरसर फिरत असतील
त्या अगाध विश्वात…
ठोठावत असतील माहितीची प्रत्येक कवाडं
आणि डोकावून पाहत असतील अनेक खिडक्यांमधून
कुठे तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात का ते!
पण तुझ्या प्रत्येक प्रश्नातून जन्म घेतो एक नवा प्रश्न
अन तयार होतं एक मोठं प्रश्नचिह्न,
मात्र तुझी बोटं थकत नाहीत..
ती सरसर चालतात प्रश्नोत्तरांच्या नव्या शृंखला आखत…
किती महाकाय जाळंय हे प्रश्नोत्तराचं …
पण तरीही प्रिये एक प्रश्न अनुत्तरितच राहतो..
ज्याचं उत्तर ह्या शृंखलामध्ये कुठे नसतं,
तिन्ही सांजा आजही एकाकी का वाटतात?
ती कसली ओढ असते जी तिन्ही सांजेच्या दिव्या प्रमाणे तेवत राहते मनामध्ये, अगदी रोज!